अंगावर पाल पडल्याने होतात फायदे!

पाल पाहून शिसारी येते, अंगावर पडली तर डोक्यापर्यंत झिणझिण्या जातात, पण तिचे अंगावर पडणे शुभ मानले जाते हे माहितीय का?

घरात मुंग्या, झुरळ, पाली, चिलटं असे अनेक जीव ये जा करत असतात, त्यात मगर सदृश पाल भिंतीवरून फिरताना दिसते, तेव्हा घृणा येते. 

मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार पालीचे अंगावर पडणे शुभ मानले जाते, मात्र शरीराच्या कोणत्या भागावर? त्याचीही माहिती दिली आहे. 

अंगावर पाल पडण्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये मोठी झेप घेता येते, नोकरीत पगार वाढीची शक्यता निर्माण होते. 

तुमच्या उजव्या कानावर पाल पडली असेल तर तुमचे आयुर्मान वाढते असे म्हणतात. 

तर डाव्या कानावर पाल पडली तर तुमचे अडकलेले काम मार्गी लागते. 

तुमच्या छातीवर पाल पडली तर भविष्यात तुमच्यावर येणारे मोठे संकट टळले असे समजायला हरकत नाही. 

डाव्या खांद्यावर पाल पडली असता येत्या काळात प्रगतीची दारं खुली होणार आहेत. 

उजव्या हातावर पाल पडली असता धनलाभाची संधी चालून येणार हे समजून जा. 

जर उजव्या पायावर पाल पडली तर लवकरच एखाद्या सहलीत, यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल. 

त्यामुळे भविष्यात पाल दिसली तरी तिच्याबद्दल घृणा वाटून न घेता काहीतरी शुभ घडणार हेच मनात आणा आणि कामाला लागा. 

Click Here