निरोगी, सुडौल शरीर आणि शरीरात ऊर्जेचा सळसळता प्रवाह अनुभवायचा असेल तर १६ तास उपासाची 'ही' आहारशैली सुरु करा.
इंटरमिटेन्ट फास्टिंग बद्दल आज अनेक जण बोलतात, पण ही आहार शैली भारतात प्राचीन काळापासून अनुसरली जात आहे. तिचे लाभ जाणून घ्या.
रविवारी अर्थात ६ जुलै रोजी चतुर्मास सुरु झाला आहे, त्या मुहूर्तावर चार महिने ही आहारशैली अनुसरून बघा, व्यक्तिमत्त्वात लक्षणीय बदल घडेल!
१६ तासांचा उपास केल्याने पोटावरची चरबी नाहीशी होते.
मधुमेही रुग्ण असतील तर त्यांची साखर नियंत्रणात राहील.
शरीर आतून पूर्णत: स्वच्छ होईल, ज्यामुळे आजारांचे मूळ नष्ट होईल आणि उत्साह, ऊर्जा याचा अनुभव येईल.
हॉर्मोन्स संतुलित राहतील, हॉर्मोन्सना बूस्ट मिळेल आणि ते सुरळीत कार्य करतील.
शरीराच्या कुठल्याही भागावर सूज जाणवत असेल तर तीदेखील या उपासाने नाहीशी होईल.
हृदयावर दाब येणार नाही, मेंदू आणखी कार्यक्षम होईल, स्मरणशक्ती वाढेल आणि पचनसंस्था सुरळीतपणे कार्य करेल.
शरीरात आणि व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल, आजारांशी लढण्यासाठी खर्च होणारी ऊर्जा वाचेल आणि तीच सकारात्मक ऊर्जेत परिवर्तित होईल.
यासाठी भोजनाची वेळ दिवसभरात दोनदाच असावी, सकाळी ९-१० आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी ६-७ या वेळी आहार घेणे उत्तम!
ही आहारशैली आणि जीवनशैली अनुसरल्यामुळे तुमचा १६ तासांचा उपास होईल आणि शरीरात लक्षणीय बदल दिसून येईल.