आरोग्याचा खजिना सालीमध्येच! 'या' ५ फळांची साल कधीच काढू नका

विविध प्रकारची हंगामी फळे पोषक तत्वांचा खजिना आहेत.

विविध प्रकारची हंगामी फळे पोषक तत्वांचा खजिना आहेत. शिवाय, या फळांच्या सालीसुद्धा पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यामुळे, काही फळे सालीसकट खाणे टाळावे. 

बहुतेक लोक चिकू सोलून खातात, पण त्याच्या सालीमध्ये देखील भरपूर पोषक तत्वे असतात, त्यामुळे ती स्वच्छ धुऊन न सोलताच खावी.

नाशपातीमध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी हे एक उत्तम फळ आहे. ते सोलून खाण्याऐवजी अख्खे खाणे अधिक फायदेशीर ठरते.

बहुतेक लोक सफरचंद सालीसकट खातात, तर काही जण साल काढून खाणे पसंत करतात, पण सालीसकट खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते.

काही लोक पेरूची साल काढून खातात, पण त्याच्या सालीमध्ये सुद्धा भरपूर फायबर असते. त्यामुळे तो सालीसकट खाण्याचा प्रयत्न करा.

काही फळांची साल खाण्यासाठी आवश्यक असते, परंतु ती फेकून देण्याऐवजी, तिचा विविध प्रकारे उपयोग करता येतो, जसे की संत्री, केळी आणि पपईच्या साली त्वचेच्या काळजीसाठी वापरता येतात. डाळिंबाच्या सालींचा उपयोग आरोग्याच्या काळजीसाठी केला जाऊ शकतो.

भाज्या आणि फळांच्या साली पोषक तत्वांनी समृद्ध असतात, पण त्यात जीवाणू आणि कीटकनाशकांचे कणही असू शकतात. म्हणून, त्यांना वाहत्या पाण्याखाली धुवा आणि बेकिंग सोडा किंवा व्हिनेगरचा वापर करा.

Click Here