हिंगामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या दूर होतात.
प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या स्वयंपाक घरात आवर्जुन दिसणारा पदार्थ म्हणजे हिंग.
कोणताही भारतीय पदार्थ हा हिंगाच्या फोडणी शिवाय अपूर्ण आहे.
हिंगामुळे पदार्थाचा जसा खमंगपणा वाढतो. तसेच त्याचे काही गुणकारी फायदे सुद्धा आहेत.
सर्दीमुळे डोकं दुखत असेल तर हिंगाच्या सेवनाने डोकेदुखीची समस्या दूर होते.
पोटात गॅस, अपचन किंवा अॅसिडिटी झाली असेल तर हिंगाचं पाणी प्यावं यामुळे पोटदुखी थांबते.
पोटात दुखत असेल तर हिंगाचं पाणी करुन ते बेंबी भोवती गोलाकार पद्धतीने लावावं. यामुळे पोटदुखी बरी होते.