गव्हांकुराचा रस आजकाल अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतो.
गव्हांकुर म्हणजे गव्हाच्या पिकाच्या कोवळ्या लोंब्या. हिरव्यागार असलेल्या या लोंब्या आरोग्यासाठी प्रचंड फायद्याच्या आहे.
गव्हांकुराचा रस आजकाल अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतो. म्हणूनच, गव्हांकुराचा रस पिण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.
गव्हांकुराच्या रसाचं सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात. शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
गव्हांकुरामुळे यकृताचं कार्य सुरळीत राहतं. शरीरात ऊर्जा निर्माण होते.
ज्या व्यक्ती वजन कमी करायचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आवर्जुन गव्हांकुराच्या रसाचं सेवन करावं.
केसगळतीची समस्या असेल तर गव्हांकुर फायद्याचं आहे. तसंच वाढत्या वयाच्या खुणादेखील गव्हांकुराच्या सेवनाने कमी होतात.