तिळाचं तेल हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
देवपूजेसाठी प्रत्येक घरात खासकरुन तिळाचं तेलच वापरलं जातं.
काही घरांमध्ये देवपूजेसोबतच स्वयंपाक घरातही तिळाचं तेल वापरलं जातं.
तिळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. यात खासकरुन रिकाम्यापोटी तिळाच्या तेलाचं सेवन करण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.
तिळाच्या तेलाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ज्यांना वारंवार पोटाच्या समस्या निर्माण होतात. त्यांनी आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करावा.
ज्यांची त्वचा कोरडी आहे. त्यांनी तिळाचं तेल खाल्ल्यामुळे त्वचेतील स्निग्धता वाढते.
हिवाळ्यात अनेकांना डोक्यात कोंडा होण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी तिळाचं तेल आहारात घ्यावं.