तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे!

आजही काही जण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यावर भर देतात.

बाजारात सध्या पाणी पिण्यासाठी काचेच्या किंवा स्टीलच्या अनेक प्रकारच्या बाटल्या उपलब्ध आहेत. परंतु, आजही काही जण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यावर भर देतात.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. हे फायदे कोणते ते पाहुयात.

शरीरातील विषारी घटक कमी करायचे असतील तर तांब्याच्या भांड्यातील पाणी आवर्जुन प्या. यासाठी किमान ८ तास हे पाणी तांब्याच्या भांड्यात राहिलं पाहिजे.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायलं तर पचनक्रिया सुधारते आणि पोट फुगणे, गॅस होणे या समस्या दूर होतात.

तांब्याच्या भांड्यात कधीही फिल्टर केलेलं पाणी भरु नका. त्याऐवजी उकळून किंवा गाळून भरलेलं पाणीच भरा.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार होते.

तांब्यामध्ये आवश्यक मिनरल्स असतात ज्यामुळे हाडे, सांधे मजबूत होतात.

वारंवार होणारी अॅसिडिटी टाळण्यासाठी फॉलो करा 'हे' रुल्स

Click Here