एका लवंगाच्या सेवनामुळे कफाची समस्या होईल दूर, अन्यही आहेत गुणकारी फायदे
पदार्थाची चव वाढवणारी ही लवंग बहुगुणीदेखील आहे
नारळी भातापासून बिर्याणीपर्यंत अनेक पदार्थांमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे लवंग.
पदार्थाची चव वाढवणारी ही लवंग बहुगुणीदेखील आहे. म्हणूनच, आज तिचे काही गुणकारी फायदे पाहुयात.
सर्दीमुळे डोकं दुखत असेल किंवा कफ छातीमध्ये जमा झाला असेल तर लवंगांचं सेवन करावं. यामुळे कफ पातळ होतो.
जर पोटात गॅस झाला असेल तर लवंग चघळा. लवंग चघळल्यामुळे पित्तप्रकोर आतल्या आत शमतो आणि ठराविक वेळेनंतर मल त्याग करायची इच्छा होते. परिणामी, पोटातील त्रास कमी होतो.
कान ठणकत असेल तरीदेखील लवंगाचं सेवन करता येतं.
सततच्या दातदुखीला कंटाळलात? मग करा 'हे' फायनल उपाय