तुरटी काखेत लावल्याने काय होईल? वाचा फायदे
तुरटीमुळे फक्त पाणीच शुद्ध होत नाही तर आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे होतात.
तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे आपल्या घामातील बॅक्टेरिया नष्ट करतात. यामुळे अंडरआर्म्सचा वास कमी येतो.
तुरटी आपली त्वचा खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते. तसेच ओपन पोर्स बंद न करता त्वचा साफ करते.
तुरटीचा रोज वापर केल्याने काखेचा रंग उजळण्यास मदत होते. त्वचेला टोन देण्यासाठी हा एक नैसर्गिक मार्ग आहे.
अंडरआर्म्समधील केस काढल्यानंतर काखेत जळजळ किंवा पुरळ येत असतील तर तुरटी लावल्याने थंडावा मिळेल.
तुरटीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत जे आपल्याला इतर संसर्गापासून वाचवतात.
तुरटी ओली करुन काखेत घासा त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
नियमितपणे तुरटीचा वापर केल्यास दुर्गंधी, काळपटपणा आणि त्वचेची जळजळ कमी होण्याची समस्या कमी होईल.