सूर्यनमस्काराचे जबरदस्त फायदे..!

दररोज सूर्यनमस्कार करा, आयुष्यभर निरोगी राहा.

शरीराची लवचिकता वाढते आणि स्नायूंना योग्य ताण मिळतो. रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा उजळून तजेलदार वाटते.

पचनसंस्था मजबूत होते. अजीर्ण, बद्धकोष्ठ यावर नियंत्रण मिळते. चरबी कमी झाल्याने वजन नियंत्रणात राहते.

हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, श्वसनशक्ती सुधारते. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो, एकाग्रता वाढते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, शरीर आजारांना कमी बळी पडते. हार्मोनल संतुलन सुधारते, महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.

पाठदुखी, मानदुखी व सांधेदुखीपासून आराम मिळतो. ताण-तणाव, चिंता कमी होते आणि मानसिक शांतता मिळते.

सकाळी केल्यास दिवसभर ऊर्जा टिकते. संपूर्ण शरीराला आतून बाहेरपर्यंत डिटॉक्सिफाय करते.

Click Here