फणसाच्या बियांचे भन्नाट फायदे; शारीरिक तक्रारी होतील दूर

टाकाऊ म्हणून फेकलेली अठळी अत्यंत गुणकारी आहे.

आजकाल बाजारात प्रत्येक फळ सहज उपलब्ध होतांना दिसतं. त्यामुळे ठराविक फळासाठी आता योग्य ऋतुची वाट पाहावी लागत नाही. यातलंच एक फळ म्हणजे फणस.

बाजारात सहज मिळणारा फणस चवीला जितका रुचकर आहे. तितकाच तो आरोग्यासाठीही फायद्याचा आहे.

फणसापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. परंतु, अनेकदा फणस खाल्ल्यानंतर त्याच्यातली अठळी फेकून दिली जाते. विशेष म्हणजे आपण टाकाऊ म्हणून फेकलेली अठळी अत्यंत गुणकारी आहे.

अनेकदा लहान मुले व्यवस्थित जेवत नाही. ज्यांमुळे त्यांना पुरेसं पोषणमूल्य मिळत नाहीत. अशावेळी मुलांना फणसाच्या अठळ्या उकडून द्याव्यात. या बियांमुळे मुलांची शारीरिक व मानसिक वाढ योग्यरित्या होते. 

फणसाच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम असते. त्यामुळे हाडांना बळकटी मिळते. ज्यांना हाडांविषयी समस्या आहेत त्यांनी आवर्जुन फणसाची बी खावी.

उन्हाळ्यात अनेकदा उकाडा, घाम यामुळे थकवा जाणवतो. अशावेळी फणासाची बी खाल्ल्यावर थकवा दूर होतो. फणसाच्या बियांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसंच शरीरातील प्रोटिनची कमतरतादेखील भरुन निघते.

काही जणांना पचनासंबंधी अनेक समस्या असतात. अशा वेळी फणसाची बी खावी यामध्ये डाएटरी फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते व बद्धकोष्ठतेसारखा त्रासही दूर होतो.

स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? 

Click Here