कसोटीत कॅप्टन्सी करताना सर्वाधिक 'गोल्डन डक'चा लाजिरवाणा रेकॉर्ड
टीम इंडियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही.
सिराजनं पहिल्याच चेंडूवर त्याला विकेटमागे पंतकरवी झेलबाद केले. यासह टेस्टमध्ये कॅप्टन्सीत तो सर्वाधिक १६ वेळा 'गोल्डन डक'चा शिकार झाला.
वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेट या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. कसोटीत कॅरेबियन संघाचे नेतृत्व करताना १६ वेळा तो पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे.
रोहित शर्मावर कसोटी कारकिर्दीत भारतीय संघाचे नेतृ्व करताना १३ वेळा 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली आहे.
बांगलादेशचे नेतृत्व करताना नजमुल शांतो ८ वेळा पहिल्या चेंडूवर बाद झाल्याचा रेकॉर्ड आहे.