बेलाच्या पानाचे 'हे' फायदे माहीत होते?

श्रावण महिन्यात साेमवारी शंकराची पूजाअर्चा केली जाते. तीन पाने असलेले बेलपत्र वाहतात. हे बेलपत्र आराेग्यासाठी किती गुणकारी आहे, हे माहिती आहे का?

बेलपत्र हे शंकराला वाहिले जाते. पण, या बेलपत्राला आर्युवेदातही महत्त्व आहे. बेलपत्र हे अनेक विकारांवर गुणकारी औषध आहे. 

मधमाशी किंवा अन्य कीटक चावल्यास खूप जळजळ हाेते. यावेळी बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास जळजळ कमी हाेते, आराम मिळताे. 

ताप आला असेल, तरी बेलपत्राचा उपयाेग हाेताे. बेलपत्राचा काढा प्यायल्यास तापामुळे हाेणारा त्रास कमी हाेण्यास मदत हाेते. 

 रक्तवाढीसाठी वाळलेल्या गराची १ चमचा पावडर राेज गरम दुधातून खडीसाखरे बराेबर घेतल्यास रक्त वाढीसाठी मदत हाेते. 

बद्धकाेष्ठतेचा त्रास हाेत असल्यास बेलाच्या पानांचे चूर्ण वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतल्यास एका आठवड्यात फरक पडताे. 

उष्णतेवरही बेलपत्र गुणाकारी आहे. उष्णतेमुळे ताेंड आले असेल, बेलाची ताजी पाने खाल्यास फरक पडताे. 

बेलपत्राचा काढा प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. हृदयराेगाचा धाेका कमी हाेताे. पण, वैद्यकीय सल्ल्यानुसारच बेलपत्राचा वापर केला पाहिजे. 

Click Here