सनस्क्रीन लावणं का आहे गरजेचं?

स्कीन सॉफ्ट आणि ग्लोइंग दिसण्यासाठी सनस्क्रीन लावलं जातं हा अनेकांचा गैरसमज आहे. 

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसणं सगळ्यांनाच आवडतं. या उन्हातून शरीराला व्हिटामिन D मिळतं. मात्र, वाढत्या प्रदूषणामुळे हे ऊनदेखील काही अंशी घातक ठरत आहे.

वाढतं प्रदूषण आणि बदलत्या पर्यावरणाचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर होतो. यातच सुर्यकिरणांमधून निघणाऱ्या UV किरणांचा त्वचेवर गंभीर परिणाम होतो. 

UV किरणांमुळे त्वचेशी निगडीत समस्या, स्कीन अॅलर्जीदेखील होते.त्यामुळे या सगळ्यापासून वाचण्यासाठी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. सनस्क्रीन लावण्याचे अन्यही काही फायदे आहेत.

स्कीन सॉफ्ट आणि ग्लोइंग दिसण्यासाठी सनस्क्रीन लावलं जातं हा अनेकांचा गैरसमज आहे. मुळात सुर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण व्हावं यासाठी सनस्क्रीन लावलं जातं.

ऊन असो वा नसो तरीदेखील सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे.  यामुळे अनेक त्वचेशी निगडीत समस्या दूर राहतात.

सनस्क्रीन लावल्यामुळे सनबर्न होणे, त्वचेवर पुरळ येणे यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. सनस्क्रीन कायम तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडावं. ज्यामुळे त्याचा अधिक फायदा मिळतो.

या ७ भाज्या कच्च्या खाण्याची चूक करू नका

Click Here