हिवाळ्यात पाहायलाच हवीत ही सुंदर ठिकाणं

या हिवाळ्यात ट्रिप प्लॅन करताय? मग ही ७ ठिकाणं चुकवू नका!

मनाली- हिमालयाच्या कुशीत वसलेलं मनाली हे हिवाळ्यातील स्वर्गच! बर्फाच्छादित रस्ते, पाइन वृक्ष आणि बर्फात खेळण्याचा आनंद यामुळे हे कपल्स आणि अॅडव्हेंचर लव्हर्सचं फेव्हरेट ठिकाण आहे. 

औली (उत्तराखंड)- भारताचं ‘स्कीइंग कॅपिटल’ म्हटले जाणारे औली हिवाळ्यातील सर्वात सुंदर पर्वतीय ठिकाणांपैकी एक आहे. येथील पर्वताचे दृश्य मन मोहून टाकतात. 

श्रीनगर- ‘पृथ्वीचे स्वर्ग’ म्हणून ओळखला जाणारे श्रीनगर हिवाळ्यात आणखीनच मोहक दिसते. गोठलेली डल लेक आणि हाऊसबोटमध्ये राहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. 

शिमला- शिमला हिवाळ्यात जणू एखाद्या गोष्टीतल्या गावासारखे दिसते. मॉल रोडवरील शॉपिंग, क्राइस्ट चर्च आणि जाखू हिलवरील दृश्ये मन प्रसन्न करतात. 

दार्जिलिंग (पश्चिम बंगाल)- धुक्याने आच्छादित चहाच्या बागा, टॉय ट्रेन आणि टायगर हिलवरुन दिसणारा हिमालयाचा सूर्योदय...शांततेत वेळ घालवायचा असेल, तर हे ठिकाण नक्की पाहा.

उदयपूर (राजस्थान)- ‘तलावांचे शहर’ उदयपूर हिवाळ्यात पर्यटकांनी गजबजलेले असते. थंड हवेत इथले रोमँटिक वातावरण अधिक सुंदर वाटते.

गोवा- गोव्याची थंड हवा आणि समुद्रकिनाऱ्यावरील फेस्टिव्हल्स अप्रतिम अनुभव देतात. डिसेंबर-जानेवारीमध्ये येथे म्युझिक फेस्ट्स, बीच पार्ट्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येतात.

Click Here