नव्या खेळाडूची उंची ६ फूट २ इंच
आगामी महिला WPL साठी गुरूवारी लिलाव झाला. त्यात RCBने एका क्रिकेटसुंदरीला संघात घेतले.
RCBमध्ये स्मृती मानधना, एलिस पेरी यांसारख्या क्रिकेटच्या सौंदर्यवती असून त्यात आणखी भर पडली.
लिलावादरम्यान इंग्लंडच्या लॉरेन बेल हिला RCBच्या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
लॉरेन बेलचा जन्म २ जानेवारी २००१चा आहे. ती अवघ्या २४ वर्षांची असून एक उत्तम गोलंदाज आहे.
लिलावात प्रतिभावान व सौंदर्यवती असलेल्या लॉरेन बेल हिच्यावर ९० लाखांची बोली लागली.
सौंदर्यासोबतच तिची उंचीही खूप जास्त आहे. RCBची नवी खेळाडू ६ फूट २ इंच इतकी उंच आहे.
आगामी WPL 2026 हंगामात लॉरेन कशाप्रकारचा खेळ करते, त्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.