हे मना बन दगड; कारण... 

अनिश्चितता हा निसर्गाचा नियम आहे. बदल घडत राहतात पण ते स्वीकारण्यासाठी श्री. श्री. रविशंकर यांनी सांगितलेले 'आर्ट ऑफ लिव्हिंग' तंत्र शिकून घ्या!

गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना अनपेक्षित, अकल्पित आहेत. जे घडलं त्यावर आपले नियंत्रण नाही, पण ते स्वीकारून पुढे जाणं आपल्या हातात आहे. 

आपल्या मनाला सगळं चांगलं, सकारात्मक आणि आपल्याला हवं तेच घडणं अपेक्षित असतं, मात्र परिस्थिती आपल्या हाती नसते तेव्हा मनःस्थिती बदलावी लागते. 

सर्वात जास्त त्रास होतो तो आपल्या प्रियजनांच्या मृत्यूचा, विरहाचा! एक ना एक दिवस सगळ्यांनाच जग सोडायचे आहे, हे स्वीकारा. 

मनुष्य म्हटल्यावर सुख दुःख ओघाने आलेच, पण त्यात वाहून न जाता स्वतःला सावरायला शिकले पाहिजे. 

कोणाबद्दलही राग मनात न ठेवता सगळं काही सोडून देत पुढे जायला शिका, आयुष्य क्षणभंगुर आहे हे लक्षात ठेवा. 

आजूबाजूला घटना घडत राहणाराच, अशात मनाला सकारात्मक ठेवण्यासाठी अध्यात्माचा वापर करा. 

प्रत्येक क्षण भरभरून जगा. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार सोडून वर्तमानात जगा, जे आहे त्यात समाधान माना आणि आनंदी राहा. 

आपल्या चांगल्या वागणुकीने जेवढे क्षण हातात आहेत त्याचे चीज करा, दुसऱ्यांचे जीवन सुसह्य बनवा. 

रडण्यात आयुष्य वाया घालवू नका तर आनंदाने जगा आणि जगू द्या, हेच आर्ट ऑफ लिंव्हिंग आहे. 

Click Here