फक्त मसाला म्हणूनच नाही तर तमालपत्राचे पाहा अनेक फायदे...
मसाल्याच्या डब्यातील 'तमालपत्राचे' ७ आश्चर्यकारक उपयोग...
कीटक आणि झुरळांना दूर ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील कपाट किंवा कपड्यांच्या कपाटात तमालपत्राची पाने ठेवा.
तमालपत्राची पाने पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी ॲक्ने -पिंपल्स घालवून त्वचेसाठी उत्तम टोनर म्हणून वापरा.
तमालपत्र पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केसांतील कोंडा कमी होतो आणि केस चमकदार होतात.
तमालपत्र अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.
तमालपत्र पाण्यात उकळून नैसर्गिक एअर फ्रेशनर तयार करू शकता.
तमालपत्राचे तेल संधिवात आणि शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करते. दुखणाऱ्या भागावर या तेलाने मालिश केल्यास आराम मिळतो.
तमालपत्राचा चहा घेतल्याने किंवा खोलीत तमालपत्र जाळल्याने त्यातील नैसर्गिक सुवासामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.