वाराणसीला गेल्यावर करु नका 7 चुका!

वाराणसीला जाण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सध्या अनेकजण व्हेकेशनमध्ये वाराणसीला जाण्याचा प्लॅन करत आहेत. या देवभूमीत जाण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती करुन घेणं गरजेचं आहे.

मोक्ष शहर म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीला प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच जाऊन यावं असं म्हटलं जातं. परंतु, इथे जाण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सध्याच्या काळात सगळीकडे ऑनलाइन पेमेंट सहज करता येतं. परंतु, वाराणसीला जातांना तुम्ही जवळ कॅश कॅरी करा.येथे काही ठिकाणी अद्यापही ऑनलाइन पेमेंटची सुविधा नाहीये. त्यामुळे तुमच्याजवळ पैसे असणं गरजेचं आहे.

वाराणसीला कायम गर्दी असते. त्यामुळे तुम्हाला बरंच लांबपर्यंत चालत जावं लागत. अशावेळी तुम्ही कम्फर्टेबल फूटवेअर वापरा. ज्यामुळे तुम्हाला चालतांना त्रास होणार नाही.

प्रवास करतांना तुमच्यासोबत पाण्याची बाटली नक्की ठेवा. कारण, पाण्यात बदल झाल्यामुळे शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमचं मिनिरल वॉटरसोबत बाळगा.

वाराणसीला गेल्यावर सगळ्यात प्रथम भैरव बाबा, त्यानंतर गणेश मंदिर आणि त्यानंतरच काशी विश्वनाथाचं दर्शन करावं असं म्हटलं जातं. तसंच संकट मोचन मंदिरात जायलाही विसरु नका.

वाराणसीला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे इथे गेल्यावर सोबत मौल्यवान वस्तू सोबत बाळगू नका. तसंच शक्यतो सकाळी लवकर उठून देवाचं दर्शन घ्या. कारण, इथे दर्शनासाठी मोठी रांग असते.

वाराणसीला कायम घाटावर बसूनच गंगा आरती पाहा. होडीमध्ये बसून व्यवस्थित आरती दिसत नाही.

मंदिरात प्रवेश करतांना चुकूनही देवळाच्या उंबऱ्यावर पाय ठेवू नका. जर असं करतांना तुम्हाला कोणी पाहिलं तर रोखलं जाऊ शकतं. तसंच देवळात जातांना डोक्यावर ओढणी किंवा रुमाल ठेवा.

डाळिंबाइतकीच त्याची पानेही आहेत गुणकारी!

Click Here