केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल, अॅंटी ऑक्सिडेंट्सचं प्रमाण भरपूर असतं.
पूर्वीचे लोक केळीच्या पानांवर जेवायचे. या पानांवर जेवल्यामुळे त्याचे शरीराला अनेक फायदे मिळायचे. परंतु, कालानुरुप आता केळीच्या पानांची जागा स्टील, काच, प्लास्टिकच्या ताटांनी घेतली आहे.
केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल, अॅंटी ऑक्सिडेंट्सचं प्रमाण भरपूर असतं. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. विशेष म्हणजे याच कारणामुळे केळीच्या पानांचा ज्यूसही अनेक जण पितात.
केळीच्या पानांचा ज्यूस ही संकल्पना अनेकांसाठी नवीन असेल. मात्र, या ज्युसचे असणारे फायदे कोणते ते पाहुयात.
या पानांमध्ये पचनक्रिया चांगली करण्यास मदत करणारे गुण असतात. केळीच्या पानांमुळे अपचन आणि डायरिया सारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
केळीच्या पानांच्या रसामध्ये डिटॉक्सीफाईंग गुण असतात. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. तसेच शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते.
केळीच्या पानांचा ज्यूस ताप कमी करण्यास खूप फायदेशीर मानला जातो. या पानांमधील फायटो केमिकल्समध्ये अॅंटी बॅक्टेरियल, अॅंटी मायक्रोबियल आणि अॅंटी इन्फ्लामेटरी गुण असतात, यांनी शरीरातील ताप कमी होतो.
(वरील माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय, प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञ वा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)