रात्री पायाच्या तळव्यांची होते आग? करा हे सोपे घरगुती उपाय

पायाची आग होण्यामागे काही कारण आहेत. 

रात्री झोपल्यावर पायाच्या तळव्यांची आग होते किंवा जळजळ होते अशी तक्रार अनेकांना असते.

पायाची आग होण्यामागे काही कारण आहेत. परंतु, योग्य काळजी आणि उपाययोजना केल्या तर पायाच्या तळव्यांची होणारी जळजळ नक्कीच कमी करता येऊ शकते.

शरीरातील पित्त वाढणे, मधुमेह, व्हिटामिन बी-12 ची कमतरता किंवा नसा कमकुवत होणे यांसारख्या समस्यांमुळे पायाच्या तळव्यांची आग होते.

पायाची जळजळ होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पाय गार पाण्यात किंवा गुलाब जलामध्ये १० मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर पायांना कोरफडीचा रस किंवा खोबऱ्याचं तेल लावा.

कोरफडीच्या रसात कापूराची पूड मिक्स करुन हा लेप तळव्यांना लावा.यामुळे नक्कीच पायाला आराम मिळेल.

व्हिटामिन बी-12 ची कमतरता असल्यामुळे पायाची आग होत असेल तर नियमितपणे न चूकता योगासने करा.

बटाटे उकडताना पाण्यात टाका लिंबाचा तुकडा

Click Here