अनेकदा लहान मुलांना पोटात जंत झाल्याची तक्रार असते.
लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही जंताचा त्रास कधीही उद्भवू शकतो. जंतांवर वावडिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे.
पोटात जंत झाल्यावर वावडिंगाचा वापर कसा करायचा ते पाहुयात.
लहान मुलांना जंत झाल्यास वावडिंग पाण्यात उकळून ते पाणी १५ दिवस मुलांना द्या. यामुळे जंत मरतात.
लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही जंताचा त्रास झाल्यास रोठा सुपारी भांडंभर पाण्यात टाकून ते पाणी उकळवा. हे पाणी पाव भांडं होईपर्यंत उकळा आणि हा काढा प्या.
वावडिंगामुळे तोंडातील कृमी वा तोंडाचे आजार असतील तर तेदेखील दूर होतात.