स्ट्रॅपलेस ब्रा जास्त वेळ घातल्याने शरीराला नुकसान होते.
सध्या स्ट्रॅपलेस ब्रा महिलांच्या फॅशन ट्रेंडचा भाग बनली आहे. ऑफ शोल्डर किंवा डीप नेक कपडे घालण्यासाठी चांगला पर्याय आहे.
स्ट्रॅपलेस ब्रा घातल्याने खाद्यांना आधार मिळत नाही. यामुळे संपूर्ण ग्रीप छातीवर येतो. वजन पाठीच्या आणि मानेच्या स्नायूंवर परिणाम करते.
घट्ट फिटिंग ब्रा त्वचेत खोलवर रुतली जाते. यामुळे पुरळ, लाल डागाच्या समस्या उद्भवू शकतात.
ब्रा घट्ट घातल्याने छातीभोवती दाब निर्माण होतो. ज्यामुळे खोल श्वास घेणे कठीण होते.
स्ट्रॅपलेस ब्रा घट्ट घातल्याने त्वचेखालील नसा आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे मुंग्या येऊ शकतात.
स्ट्रॅपलेस ब्रा चा पुरेसा आधार नसल्यामुळे शरीर पुढे वाकते यामुळे मणक्यावर ताण येतो. ज्यामुळे शरीराची स्थिती बिघडू शकते.
सतत स्ट्रॅपलेस ब्रा घातल्याने स्तनांचा नैसर्गिक आकार आणि उंची प्रभावित होऊ शकते.
घट्ट ब्रा घातल्याने ऊतींवर सतत दबाव येतो, ज्यामुळे लहान गाठी किंवा सूज येण्याची समस्या उद्भवते.