देवघर हा आपल्या घरातील अत्यंत पवित्र आणि सकारात्मक कोपरा, त्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी पुढील चुका टाळा.
देवघर लाकडी असावे आणि ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला हवे.
देवघर कधीही बेडरूम, स्टोअर रूम, पायऱ्यांच्या खाली, तसेच टॉयलेट-बाथरूम समोर नसावे, त्याचे स्थान स्वतंत्र असावे.
देवघरात लक्ष्मीची उभी मूर्ती नाही तर आसनस्थ मूर्ती असावी, अन्यथा लक्ष्मी आपल्या घरात थांबत नाही. त्यासोबतच अन्नपूर्णेची मूर्ती आणि श्रीयंत्र असावे.
देवघराजवळ पितरांचे फोटो ठेवू नये, त्यांचे स्थान स्वतंत्र असावे.
देवघराच्या जवळ कुठलीही अडगळ नसावी, निर्माल्य देखील त्या भागात ठेवू नये, अस्वच्छता राखू नये.
देवासमोर सकाळी तेलाची समई आणि सायंकाळी तुपाचे निरांजन लावावे. दोन्ही एकाच वेळी लावताना वेगवेगळ्या काडीने लावावे.
देवघरात शंकराची मूर्ती अथवा फ्रेम ठेवू नये, त्याऐवजी शिवलिंग ठेवून त्याची पूजा करावी.
देवाला रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा, तसेच आपण जेवण्याआधी एक ताट देवघरासमोर मांडून त्याचाही रोज नैवेद्य दाखवावा.
देवघराच्या वर कोणत्याही प्रकारचे सामान ठेवू नये. तसेच आपल्यापेक्षा देवघर विशिष्ट उंचीवर असावे, खाली नसावे.