ऑफिसमध्ये 'या' चुका पडतील महागात! 

ऑफिसमध्ये कामच प्रेशर असतं. डेड लाईन पाळण्यासाठी घाई करत असताना या चुका केल्यास तुम्हाला त्या नक्कीच महागात पडू शकतात. 

ऑफिसमध्ये इतरांच्या कामामध्ये उगाच ढवळा ढवळ करणे. आपल्या कामात लक्ष न देता दुसऱ्यांना सल्ले देणे. 

ऑफिसच्या वेळा न पाळणे. विना कारण ऑफिसला उशिरा जाणे. डेड लाईन संपली तरी काम पूर्ण न करणे. 

ऑफिसमध्ये काही न कळवता अचानक सुट्टी घेणे. असं केल्याने तुमच्या इमेजला धक्का लागतो. 

नवीन आयडिया देणे, स्वतःहुन कामाची जबाबदारी घेणे. या गोष्टी सातत्याने टाळत असाल तर ही धोक्याची घंटा आहे. 

कामाच्या वेळेत दुसऱ्यांबरोबर गप्पा मारत बसणे. दुसरे काम करत असताना मोठ्या आवाजात फोनवर बोलणे. 

छोट्या छोट्या गोष्टीविषयी सतत तक्रार करत राहणे. दुसऱ्याच्या सतत तक्रारी बॉसला सांगणे. 

शक्य नाही तिथे नाही म्हणायला शिका. खूप जास्त काम घेत राहिलात तर कामाच्या क्वालिटीवर परिणाम होतो. 

ऑफिसमध्ये स्वतःची चांगली इमेज ठेवायची असेल तर नक्कीच या सगळ्या चुका टाळा. 

Click Here