मुलांसमाेर तुम्ही नक्की काय बाेलता?

घरात लहान मुलांसमोर काेणत्या गाेष्टी बाेलताे? हे तुमच्या लक्षात येत का? तुम्ही मुलांसमाेर काय बाेलता, हे तुम्ही लक्ष देत आहात का? 

अनेकदा रागाच्या भरात किंवा काही गाेष्टी मुलांच्या कानावर पडायला नकाे असतात. पण, त्या मुलांसमाेर बाेलल्या जातात. 

काही गाेष्टी मुलांच्या मनावर खाेल परिणाम करतात. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर या गाेष्टींचा परिणाम हाेत असताे. अशा काेणत्या गाेष्टी आहेत?

घरातील वाईट नातेसंबंधांविषयी मुलांसमाेर कधीही चर्चा करू नये. मुलांसमाेर या नात्यातील कटू बाजू दाखवल्यास त्यांच्यावर परिणाम हाेताे. 

घरात पैशांचे प्राॅब्लेम असतील, तरीही त्या विषयी मुलांसमाेर चर्चा करू नये. याचा ताण मुलांवर येताे. मुलांना त्याचा त्रास हाेताे. 

काेणतीच व्यक्ती परफेक्ट नसते. यामुळे मुलांकडूनही चूका हाेत असतात. पण, सातत्याने मुलांच्या चुकांवर बाेलू नये. त्यांचे काैतुकही केले पाहिजे. 

मुलांसमाेर बाेलताना कधीही अपशब्द वापरू नयेत. घरातील माेठी माणसं अपशब्द वापरत असतील तर मुलही या शब्दांचा वापर करतात. 

मुलांची दुसऱ्याबराेबर तुलना करू नये. काेणतीच दाेन मुल कधीच सारखी नसतात. तुलना केल्याने इर्षा निर्माण हाेऊ शकते. हे मुलांसाठी चांगले नाही. 

सतत फक्त मुलांचे काैतुक करणे टाळावे. मुलांना फक्त चांगले म्हणणे हे देखील त्यांच्या दृष्टीने चांगले नाही, याचा वाईट परिणाम मुलांवर हाेताे. 

Click Here