ऑटो-टॅक्सी मीटर वेगाने वाढतो? कसे ओळखाल?

ऑटो-टॅक्सीतून जाताना मीटर वेगाने वाढतो आहे का? असा प्रश्न अनेकदा मनात येतो.

रिक्षा आणि टॅक्सी या माध्यमातून हजारो लोक दररोज प्रवास करत असतात.

अनेकदा आपण ज्या रिक्षा किंवा टॅक्सीत बसलो आहोत, त्याचा मीटर जरा जास्तच वेगाने जात असल्याची शंका अनेकांना अनेकदा येते.

ऑटो, टॅक्सीमध्ये प्रवास करताना अनेकदा मीटरमधील हेराफेरीमुळे मीटरचे आकडे वाढताना दिसतात.

ठराविक अंतरासाठी जास्त बिल घेत असल्याने अनेकदा प्रवासी, चालकांमध्ये वाद होत असल्याचे समोर येते.

चालकांची लबाडी ओळखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. 

अनेकदा मीटरमधील आकड्यांच्यामध्ये एकच डॉट असेल तर मीटर योग्य आहे. 

मात्र डॉट नंतर असलेल्या आकड्यांच्या शेजारी आणखी एक ब्लिंग होणारा डॉट दिसल्यास त्या मीटरमध्ये गडबड असल्याचे समजून जावे. 

मीटरचे आकडे वेगाने वाढताना दिसता तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Click Here