गुलाबी रंगाच्या पाण्याचा तलाव!

तुम्ही कधी गुलाबी रंगाच पाणी पाहिल आहे का? ऑस्ट्रेलियामध्ये एक तलाव आहे, तिथे पाण्याचा रंग गुलाबी आहे. 

ऑस्ट्रेलियातील Lake Hillier येथे पाण्याचा रंग गुलाबी आहे. हा निसर्गाचा अद्भूत चमत्कार आहे. 

ऑस्ट्रेलियात Middle Island, Recherche Archipelago मध्ये समुद्र किनाऱ्याजवळ  Lake Hillier आहे. 

१८०२ मध्ये Matthew Flinders या इंग्रज संशोधकाने Lake Hillier शोधलं. त्यावेळी गुलाबी रंग पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं.

गुलाबी रंगासाठी मुख्य कारण आहे, Dunaliella salina नावाचे सूक्ष्म शेवाळं. साॅल्ट आणि शेवाळ्यामुळे या पाण्याचा रंग गुलाबी झाला आहे. 

Lake Hillier येथील पाण्याचा रंग नेहमीच गुलाबी राहताे. या तलावातील पाणी बाहेर काढले किंवा हवेच्या संपर्कात आले तरी गुलाबी रंगाचे दिसते. 

Pink Lake, Senegal, Hutt Lagoon, Australia येथे ही गुलाबी रंगाचे तलाव आहेत. पण, Lake Hillier चा रंग स्थिर आणि नेत्रदीपक आहे.

Lake Hillier मध्ये पाेहता येत नाही. हे नैसर्गिक संरक्षित क्षेत्र आहे. पर्यटक या तलावात बाेटीतून फिरू शकतात किंवा एरियल व्ह्यू पाहू शकतात. 

NASA च्या उपग्रहाने घेतलेल्या फोटोमध्ये Lake Hillier गुलाबी रंगाने संपूर्ण चमकताना दिसताे. निळ्या समुद्रावर एक सुंदर contrast तयार होतो.

Click Here