ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके झळकवणारे ५ फलंदाज

रोहित-विराटला खुणावतोय सचिनचा महारेकॉर्ड

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक शतकांचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. 

१९९१ ते २०१२ या काळात सचिन तेंडुलकरनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७१ वनडे सामने खेळताना ९ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.

रोहित शर्मानं आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ४६ वनडे सामन्यात ८ शतके झळकावली आहेत. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याला तेंडुलकरला मागे टाकण्याची संधी आहे. पण यासाठी त्याला किमान दोन शतके ठोकावी लागतील.

कोहलीनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५० वनडेत ८ शतके झळकावली आहेत. तोही दोन शतकांसह या यादीत टॉपला पोहचू शकतो.

वेस्ट इंडिजचा डेसमंड हेन्स याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत ६ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील फाफ ड्युप्लेसिस याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ वनडेत ५ शतके झळकावली असून तो टॉप ५ मध्ये असल्याचे दिसून येत.

Click Here