२ जागा अन् ५ दावेदार
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची निवड करताना कोच गंभीरसह निवडकर्त्यांसमोर मोठा पेच असेल.
भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व हे सूर्यकुमार यादवकडे आहे. टी-२०मध्ये अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करताना दिसले आहे.
आशिया कपसाठी दोन सलामीवीरांच्या जागेसाठी ५ दावेदार आहेत. १५ सदस्यीय संघात यातील कुणाला संधी मिळणार ते पाहण्याजोगे असेल.
संजू सॅमसन विकेटमागील जबाबदारीसह डावाची सुरुवात करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
अभिषेक शर्मानं हा स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आशिया कप स्पर्धेत त्याला पसंती मिळणार का? हा मुद्दाही सध्या चर्चेचा विषय ठरतोय,
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दमदार कामगिरीनंतर शुबमन गिल टी-२० संघात परतला तर काय? कारण तोही याआधी सलामीवीराच्या रुपात दिसलाय.
याशिवाय यशस्वी जैस्वालही कमालीच्या फॉर्ममध्ये आहे.
ऋतुराज गायकवाडच्या रुपातही एक पर्याय टीम इंडियाकडे उपलब्ध आहे. या पाच पैकी किमान तिघांची निवड होईल. त्यात कुणाची वर्णी लागणार ते पाहण्याजोगे असेल.