ही अभिनेत्री नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पंढरपूरची 'वारी' हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे.
आज पंढरपूरमध्ये आषाढी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे.
याच निमित्ताने एका मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या विठ्ठलरुपातील फोटोंची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे शिल्पा ठाकरे आहे.
शिल्पा ठाकरे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
सध्या ती सन मराठी वाहिनीवरील 'नवी जन्मेन मी' मालिकेत काम करताना दिसते आहे.