शिवाली परब या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून शिवाली परब घराघरात पोहोचली.
आपल्या विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांना कायम खळखळून हसवलं.
शिवाली परब सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
नुकतेच अभिनेत्रीने आषाढी एकादशीनिमित्त इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.
"विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
शिवाली परबचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.