पाहा काही सुंदर फोटो
आज आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आहे.
खास गोष्ट म्हणजे लाडकी लेक दिविजा फडणवीसदेखील पुजेला उपस्थित होती.
अमृता फडणवीस यांनी या पूजेचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
"देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन व पूजन..! काही सुंदर क्षण" असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं.
यावेळी त्यांनी नेसलेली साडी ही लक्षवेधी ठरली.
केशरी रंगाच्या साडीत अमृता फडणवीस सुंदर दिसत होत्या.
अमृता यांनी केसांची वेणी बांधून हेअरस्टाईल केली होती.