अवघ्या २५ ते ३० वयामध्ये सांधेदुखीचा त्रास होण्यामागे काही कारणं आहेत.
वय वाढायला लागलं की सांधेदुखी, कंबरदुखी यांसारख्या समस्या डोकं वर काढू लागतात. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये ३० वर्षाच्या तरुणांमध्येही सांधेदुखीची समस्या दिसून येत आहे.
अवघ्या २५ ते ३० वयामध्ये सांधेदुखीचा त्रास होण्यामागे काही कारणं आहेत. यात सगळ्यात मोठं कारण म्हणजे धूम्रपान.
एका अभ्यासानुसार, सतत धूम्रपान केल्यामुळे खांदे, हात यांसारख्या अवयवांमध्ये हळूहळू तीव्र वेदना होण्यास सुरुवात होते.
ज्या व्यक्ती धुम्रपान करतात त्यांना रुमेटाइड आर्थराइटिस आणि ऑस्टियोआर्थराइटिसचा धोका हा सर्वाधिक असतो.
धूम्रपान केल्यामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा स्तर वाढतो. ज्यामुळे सांध्यांमध्ये सूज येणे आणि इम्युनिटी पॉवरवर परिणाम होणे अशा समस्या वाढतात. ज्यामुळे कमी वयात सांधेदुखीचा त्रास होतो.
जर्नल ऑफ रुमेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, धूम्रपान करणाऱ्यांमध्ये आर्थराइटिसचा धोका हा ६० टक्क्यांपेक्षा जास्त असतो.
यंदाच्या दिवाळीत दूर करा मतभेद, आपल्या प्रियजनांचा रुसवा करा दूर