पहिल्यांदा घर खरेदी करताना अजिबात करू नका 'या' चुका
स्वमालकीचं घर घेणं हा आयुष्यातील मोठा निर्णय असतो; पण हा निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा.
स्वमालकीचं घर घेणं हा आयुष्यातील मोठा निर्णय असतो; पण हा निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा. खासकरून पहिल्यांदाच घर खरेदी करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
गृहकर्जघेतल्यांतर फक्त इएमआय भरावा लागत नाही तर,मेंटेनन्स, कर, वीज-पाणी, दुरुस्ती असेही खर्च येतात. गृहकर्जाचाइएमआय पगाराच्या ३५-४०% पेक्षा जास्त नसावा.
इएमआय सुरू झाल्यावर खर्च आटोक्यात ठेवा बाहेरचे खाणे, ऑनलाइन खरेदी कमी करा. यामुळे आपत्कालीन फंड तयार होईल. हा फंड आवश्यक असेल तेव्हा इएमआयसाठी उपयोगी पडेल.
ब्रोकर टाळा : घर खरेदी करून देणारा एजेंट घराच्या किमतीच्या १-१.५% कमिशन घेतो. म्हणूनच थेट बिल्डर किंवा मालकाकडून प्रॉपर्टीघ्या. यामुळे लाखोंची बचत होऊ शकते.
जास्तीत जास्त डाउनपेमेंट: शक्य असल्यास २०-३०% रकमेइतकंडाऊनपेमेंट भरा. यामुळे इएमआय कमी होईल; तसंच व्याजात मोठी बचत होईल.
घराचे वय तपासा : आरसीसी इमारतीचं वय ७०-८० वर्षे इतकं असतं; पण जुनी प्रॉपर्टी घेतल्यास रिसेलव्हॅल्यू कमी येते आणि देखभाल खर्च जास्त असतो.
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन