नवरोबासाठी खास शब्दांत मांडल्या भावना, तिनं नेमकं काय म्हटलंय?
कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात स्पॉट झाला. ही गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
आता अनुष्का शर्मानं सोशल मीडियावरुन विराट कोहलीसाठी शेअर केलेली खास पोस्ट चर्चेत आलीये.
अनुष्का शर्मानं किंग कोहलीच्या 'विराट' यशामागची खास गोष्ट आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केल्याचे दिसून येते.
अनुष्काची इन्स्टा स्टोरी
विराट कोहलीच्या यशात अनुष्का शर्माचा मोठा वाटा राहिला आहे. क्रिकेटरनं स्वत: वेळोवेळी पत्नी सपोर्ट सिस्टीम असल्याचे सांगितले आहे.
कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यावर अनुष्काने भावूक पोस्ट शेअर करताना संघर्षाच्या काळात त्याचे अश्रू पाहिलेत असा उल्लेख केला होता.
Your Page!