पिरिअड्समध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्याचे उपाय

मासिक पाळीच्या काळात प्रत्येक स्त्रिला होणारा त्रास हा वेगवेगळा असतो. 

मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास हा कोणत्याही स्त्रिला चुकलेला नाही.

काही स्त्रियांना पोटदुखी, कंबरदुखीचा प्रचंड त्रास होतो. तर, काही स्त्रियांना रक्तस्राव जास्त प्रमाणात होतो.

मासिक पाळीच्या काळात प्रत्येक स्त्रिला होणारा त्रास हा वेगवेगळा असतो. यामध्येच या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना कमी करण्याच्या काही टिप्स पाहुयात.

रीबूट गट हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर आणि डाएटिशियन मनप्रीत यांनी मासिक पाळीतील वेदना कमी करण्याचे उपाय सांगितले आहेत.

पिरिअड्सच्या काळातील वेदना कमी करण्यासाठी आलं, बडीशोप आणि दालचिनी यांचा काढा प्यावा.

हा काढा दिवसातून २ वेळा प्यावा. यामुळे पोटदुखीच्या वेदना कमी होतात. तसंच ब्लड फ्लोदेखील सुधरतो.

झोपेतून उठल्यावर प्या पाणी! 'या' ५ समस्या पळतील कोसोदूर

Click Here