वाढत्या वयात खा ५ फळे, चाळीशीतही दिसाल वीस वर्षांच्या तरुणीसारखे...
ऐन तारुण्यात अकाली वृद्धत्व येण्याची समस्या ही अनेकांमध्ये दिसून येत आहे. त्यासाठी आहारात बदल करायला हवा.
अकाली वृद्धत्वाचे महत्त्वाचे कारण म्हणजे जळजळ कमी करण्यासाठी अँटीऑक्सि़डंट आणि दाहक-विरोधी पदार्थ खावेत.
आपल्या खाण्याच्या सवयी शरीर आणि चेहऱ्यावर परिणाम करतात. म्हणून आपण आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.
फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी काही खास फळं खायला हवी.
डाळिंबामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म आढळतात. जे त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात.
संत्री हे फळ वृद्धत्व रोखण्यासाठी परिपूर्ण आहे. यात असणारे व्हिटॅमिन सी आणि बीटा- कॅरोटीन त्वचेसाठी चांगले मानले जाते.
बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन सी अधिक आहे. जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.
अननस हा अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी सर्वोत्तम आहे.