वाळवंट म्हटलं की लगेच वाळू, प्रचंड उन्हाळा असं चित्र आपल्यासमाेर उभे राहते. अशा विस्तीर्ण पसरलेल्या भागाला वाळवंट म्हणताे.
प्रत्यक्षात वाळवंट म्हणजे असा प्रदेश जिथे खूप कमी पाऊस पडताे. ज्या भागात सजीव सृष्टीला राहणे कठीण असते. अशा भागाला वाळवंट म्हणतात.
जगातलं सर्वात माेठं वाळवंट म्हणजे सहारा असे सहज उत्तर मिळते. पण, आता वाळवंटाची व्याख्या कळल्यावर हे उत्तर नक्कीच बदलेल.
जगातलं सर्वात माेठं वाळवंट म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही माेठे म्हणजे अंटार्टिका. सहारापेक्षा हे वाळवंट खूप माेठे आहे.
अंटार्टिका म्हटलं की डाेळ्या समाेर बर्फाच्छादित प्रदेश, कमी तापमान असे चित्र उभे राहते. हा भूभाग खूप माेठा आहे.
अंटार्टिकाला दरवर्षी २ इंचापेक्षा कमी पाऊस हाेताे. म्हणून अंटार्टिकाला धुव्रीय वाळवंट असे म्हणतात.
अंटार्टिकाचे क्षेत्रफळ १.४ काेटी चाै. किमी इतके विस्तीर्ण आहे. सहारा वाळवंटाचे क्षेत्रफळ ९२ लाख चाै. किमी इतके आहे.
अंटार्टिकाचा भाग हा बर्फाच्छादित असताे. पण, या भागात ओलावा कमी आहे. यामुळे या भागात जीवन जवळजवळ अशक्य आहे.
अंटार्टिका हा प्रदेश बर्फामुळे पांढरा दिसत असला तरी जगातलं सगळ्यात माेठ पांढऱ्या बर्फाच वाळवंट म्हणजे अंटार्टिका आहे.