छाेट्याशा दिसणाऱ्या मुंगी विषयी तुम्हाला काही खास गाेष्टी माहिती आहेत का? या छाेट्याश्या मुंगीच आयुष्य किती असते? मुंगी किती आणि कसं काम करू शकते?
छाेटीशी दिसणारी मुंगी दिवसभरात, तिच्या आयुष्यात खूप काम करत असते. ती काम करताना टीम वर्क करून जास्तीत जास्त काम करते.
मुंगीचा जन्म हा अंड्यातून हाेताे, मग अळी, मग काेष आणि यातून प्राैढ मुंगी तयार हाेते. ६ ते १० आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण हाेत नाही.
कामकरी मुंगी ही २ ते ३ महिने, नर मुंगी काही दिवस ते आठवडे आणि राणी मुंगी तब्बल १५ ते २० वर्षे जगते.
मुंगीचे स्वतःचे वजन कमी असते. पण, ही छाेटीशी मुंगी तिच्या वजनाच्या ५० पट वजन उचलू शकते. रांगेत काम केल्याने हे ओझं उचलणे साेपे जाते.
मुंग्या नेहमी एका रांगेत काम करताना दिसतात. याचे कारण तुम्हाला माहिती आहे का, या एका रांगेत का चालतात?
मुंग्याच्या शरीरातून एक खास pheromone नावाचा सुगंधी द्रव बाहेर येताे. या द्रवामुळे सगळ्या मुंग्या एका लाईनमध्ये सरळ चालतात.
मुंग्यासाठी हा सुगंधी द्रव नकाशा सारखे काम करताे. अन्न मिळाल्यावर हा द्रव त्यांच्या शरीरातून बाहेर पडताे आणि मुंग्यांना रस्ता मिळताे.
मुंग्या एका लाईनमध्ये चालत असल्याने त्यांना अन्नापर्यंत पाेहचता येते. शिकाऱ्यांपासून त्यांना स्वतःचा बचाव करता येताे.