पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
गुलाबी नऊवारी, साजेसे पारंपरिक दागिने आणि केसांचा अंबाडा अशा अस्सल महाराष्ट्रीय लूकमध्ये अंकिता तयार झाली
आज वटपौर्णिमेनिमित्त तिने केलेला हा पेहराव पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत
लग्नानंतर अंकिताची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे
अंकिताचा नवरा कुणालही तिला मॅचिंग गुलाबी सदरा घालून आला होता. विशेष म्हणजे त्यानेही तिच्यासाठी आज उपवास केला आहे.
अंकिताने सासरी माणगावला वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या झाडाला फेऱ्या मारत तिने जन्मोजन्मी हाच नवरा मिळो अशी प्रार्थना केली
तसंच वडाच्या झाडाची मनोभावे पूजाही केली. अंकिताचं आजचं फोटोशूट खूपच व्हायरल होत आहे
अंकिता आणि कुणालच्या जोडीला नजर न लागो अशी कमेंट अनेकांनी केली आहे.