"भीती वाटायची..."; अंकिताला आली सुशांतची आठवण

"सुशांत खूप चांगला अभिनेता होता, मला खूप मदत करायचा"

पवित्र रिश्ता या टीव्ही शोला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

नवीन व्लॉगमध्ये अभिनेत्रीने याचं सेलिब्रेशन केलं. तिने अर्चनाचा गेटअप केला होता. अंकितासोबत उषा नाडकर्णीही होत्या.

दोघींनीही जुन्या आठवणी ताज्या केल्या. अंकिताला यावेळी सुशांतचीही आठवण आली. तो सेटवर तिला कशी मदत करायचा हे सांगितलं.

अंकिता भावुक झाली आणि म्हणाली, "सुशांत खूप चांगला अभिनेता होता. तो मला खूप मदत करायचा. जेव्हा मी या लोकांसमोर जायचे तेव्हा मला भीती वाटायची."

"मी विचार करायचे की, मी इतके मोठे सीन कसे करेन? त्यावेळी सुशांत मला ते करायला शिकवायचा, कसं करायचं ते सांगायचा."

आज सुशांत या जगात नाही. अंकिताने सार्वजनिक व्यासपीठांवर, मुलाखतींमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सुशांतचा उल्लेख अनेकदा केला आहे.

Click Here