संवादासाठी असते प्राण्यांची वेगळी भाषा 

जगातील काहीच प्राण्यांचे विशिष्ट आवाज आपल्याला माहित आहेत. पण, प्रत्येक प्राण्यांची संवादासाठी एक विशिष्ट भाषा असते.

जिराफ, मासे, मधमाशा यांचा आवाज कधी ऐकला आहे का? यांचा आवाज आपल्या पर्यंत पाेहचत नाही.

पण, प्राणी, पक्ष्यांचे आवाज माणसांपर्यंत पाेहचत नसले, तरी प्रत्येक पक्षी, प्राणी संवाद साधत असताे, त्याचा विशिष्ट पद्धतीने. 

जिराफ Infrasound मध्ये बोलतात. जिराफाच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी इतकी कमी असते, की माणसांना ताे आवाज ऐकू येत नाही. 

हत्ती सुद्धा infrasound वापरतात. पण, हत्तींचे वैशिष्ट्य म्हणजे ते १० किमीपर्यंत लांब अंतरावर राहणाऱ्या इतर हत्तींशी बोलू शकतात.

मांजरीचा आवाज सगळ्यांनाच माहिती आहे. पण, म्याव हा आवाज फक्त माणसांसाठी त्यांनी तयार केला आहे. 

मांजरी एकमेकींशी संवाद साधताना म्याव हा आवाज वापरत नाहीत, त्यांच्या संवादासाठी वेगळे आवाज त्या वापरतात. 

ब्लू व्हेल माशाचा आवाज माेठा असताे. या माशांचा आवाज पाण्याखाली शेकडाे किलाेमीटर दूर ऐकू येऊ शकताे. 

डॉल्फिन्स खास signature whistles वापरतात. जणू त्यांची स्वतःची नावं असतात आणि एकमेकांना नावाने हाक मारतात.

पक्षी केवळ गाण्यासाठी नाही, तर शिकाऱ्यांपासून सावध करण्यासाठी, जोडीदार शोधण्यासाठी आणि आपली जागा राखण्यासाठीही गातात.

मधमाशा संवाद साधण्यासाठी आवाज नाही तर नाचाचा वापर करतात. मधमाशा नाचून एकमेकांना सांगतात की, फुलं कुठे आहेत आणि तिथे किती मध आहे.

शार्क पाण्यातील हलक्या विजेच्या लहरी (electric fields) ओळखून संवाद साधतात. आपल्यासाठी त्यांचा संवाद हा अगदीच अदृष्य असताे.

Click Here