रताळं अनेकांना आवडत नाही. परंतु, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
उपवासाच्या दिवशी आवर्जुन खाल्ली जाणारी कंदमुळ भाजी म्हणजे रताळं.
रताळ्यापासून अनेक पदार्थ करता येतात. अगदी रताळ्याच्या शिऱ्यापासून ते चिप्सपर्यंत अनेक पदार्थ या एकाच कंदापासून करता येतात.
रताळं अनेकांना आवडत नाही. परंतु, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. रताळं खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
रताळ्यामध्ये जीवनसत्त्व A आणि बीटा कॅरोटिन मोठ्या प्रमाणावर असतं. ज्यामुळे UV किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करते. म्हणूनच, डोळ्यांच्या आरोग्यासाठी रताळं खावं.
रताळ्यामुळे पचनशक्ती सुधारते. यामुळे पोटदुखी, आम्लता, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात.
जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी रताळे हा एक उत्तम पर्याय आहे. रताळे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते.