डाळिंबाचे दाणे खाण्याचे फायदे सगळ्यांनाच ठावूक आहे. परंतु, डाळिंबासोबतच त्याची पानेही तितकीच गुणकारी आहेत.
सर्दी-खोकल्यासारख्या किरकोळ आजारात डाळिंबाची पानं अत्यंत गुणकारी ठरतात. सर्दी-खोकला झाल्यास डाळिंबाच्या पानांचा काढा करुन तो प्यावा.
अनेकांना रात्री व्यवस्थित झोप न लागण्याची तक्रार असते. अशावेळी डाळिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी रात्री झोपण्यापूर्वी घ्यावं. यामुळे झोप न लागण्याची समस्या दूर होते.
चेहऱ्यावर खूप पिंपल्स किंवा डाग असतील तर त्यावर डाळिंबाच्या पानांची पेस्ट करुन हा लेप लावावा. तसंच डाळिंबाचा रसही चेहऱ्यावर लावता येतो. यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद होण्यास मदत मिळते.
पोटदुखीची समस्या असल्यास डाळिंबाच्या पानांचं सेवन करावं. यामुळे जुलाब, पोटात मुरडा येणं यासारख्या समस्या दूर होतात.