वांग्याची भाजी पाहून नाकं मुरडता? मग जाणून घ्या, गुणकारी फायदे
वांग्याच्या भाजीत अनेक गुणकारी घटक आहेत
वांग्याची भाजी म्हटलं की अनेक जण नाकं मुरडतात. अनेकांना वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही.
वांग्याच्या भाजीत अनेक गुणकारी घटक आहेत. परंतु, याविषयी फारसं कोणाला ठावूक नाही. म्हणूनच, वांग्यांचे गुणधर्म आणि शारीरिक फायदे कोणते ते पाहुयात.
वांग्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. तसंच, डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी देखील वांग्याचे सेवन उपयुक्त ठरते.
वांगीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, जे वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास तसेच हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
मधुमेहाच्या रूग्णांनी नियमित आहारात वांग्यांचा समावेश करावा. वांग्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते.
मूळवाधीची समस्या असेल तर आहारात पांढऱ्या वांग्याचा समावेश करावा. तसंच मुळव्याध झालेल्या ठिकाणी भाजलेल्या वांग्याचा शेक दिला तर आराम मिळतो. यासाठी भाजलेलं वांगं फडक्यात बांधून शेक द्यावा.