फक्त बॉडीबिल्डिंगसाठीच नाही, तर वेट लिफ्टिंगचे इतर अनेक फायदे; जाणून घ्या...
वेट लिफ्टिंगमुळे स्नायू मजबूत होतात व शरीराला टोन मिळतो. तसेच, शरीरात कट्स दिसतात आणि शारीरिक ताकदही वाढते.
नियमित वजन उचलल्याने हाडे मजबूत होऊन दीर्घकाळ निरोगी राहतात. तसेच, हाडांची घनता वाढते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
यामुळे मेटाबॉलिझम वेगवान होते, चरबी पटकन कमी होते. तसेच, वजन नियंत्रणात राहते आणि शरीर स्लिम दिसते.
नियमित व्यायामामुळे हृदय व रक्ताभिसरण आरोग्य सुधारते आणि हृदयाचे कार्य चांगले होऊन ऊर्जा वाढते.
वेट लिफ्टिंगमुळे शक्ती आणि सहनशक्ती दोन्ही मिळते. घरकाम असो वा ऑफिसचे, सगळ्यात उत्साह टिकतो.
यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. नियमित व्यायामामुळे एंडॉर्फिन्स स्रवतात, जे मन प्रसन्न ठेवतात.
वेट लिफ्टिंगमुळे शरीर सशक्त राहते आणि वय दिसत नाही. वय वाढले तरी फिटनेस आणि चपळता टिकते.