पिंपळाच्या पानामुळे अनेक व्याधी दूर होतात.
पिंपळाचं झाडं हे बहुगुणी असून त्याच्या पानांपासून ते खोडापर्यंत प्रत्येक गोष्ट ही औषधोपचारांमध्ये वापरली जाते.
पिंपळाच्या पानांपासून तयार केलेलं ज्यूस प्यायल्यास यकृताशी निगडीत समस्या दूर होतात.
बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या तक्रारी पिंपळामुळे दूर होतात. तसंच पचनक्रिया सुधारत.
पिंपळाच्या पानांचा रस प्यायल्यास रक्त शुद्ध होते. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
कावीळ आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांमध्ये पिपळाच्या पानांचा वापर खूप फायदेशीर आहे.
पिंपळाच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, वेदना कमी करणारे आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
(वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)