चौघींनी साधलाय शतकी डाव
ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार एलिसा हीली हिने भारतीय संघाविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रमी खेळी साकारली आहे.
विशाखापट्टणमच्या मैदानात १४२ धावांच्या खेळीसह ती वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारी बॅटर ठरली.
२०१३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या शार्लट एडवर्ड्स हिने टीम भारतीय महिला संघाविरुद्ध १०९ धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियन कॅरेन रोल्टन हिने २००५ च्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध नाबाद १०७ धावांची खेळी केली होती.
इंग्लंडच्या जॅन ब्रिटीन हिने १९९३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाविरुद्ध १०० धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.
जिल केन्नारे हिने १९८२ च्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाविरुद्ध ९८ धावांची खेळी केली होती.