नाचणी सत्व ते तुळशीचा काढा! आजीबाईच्या बटव्यातील या घटकांमुळे वाढवा प्रतिकारशक्ती 

शरीराचं आरोग्य उत्तम राखणं गरजेचं आहे.

बदलत्या लाइफस्टाइलच्या काळात शरीराचं आरोग्य उत्तम राखणं तितकंच गरजेचं झालं आहे.

आज आपण आजीबाईच्या बटव्यातील अशा काही वस्तू, पदार्थ पाहुयात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.

प्रत्येकाच्या दारासमोर सहज दिसून येणारी तुळस अत्यंत गुणकारी आहे. रोज तुळशीची १० पानं चावून खावीत त्यामुळे शरीरातील जंतूसंसर्गाला आळा बसतो.

'तूप खाऊन रूप येतं' असं म्हटलं जातं ते खोटं नाही. रोज तूप खाल्ल्यामुळे शरीराला वंगण मिळतं.

आहारात दररोज अर्धी लिंबाची फोड नक्की घ्यावी.

दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व नक्की घ्या. 

गूळ खाल्ल्यामुळे तरतरी येते. तसंच घसा कोरडा पडल्यास गूळ किंवा खडीसाखर खावी.

अभ्यास करतांना झोप का येते? ही आहेत मुख्य कारणं

Click Here

Your Page!